अ. क्र. | शिक्षकांचे नाव | हुद्दा | शैक्षणिक पात्रता | व्यावसायिक पात्रता |
---|---|---|---|---|
1 | श्री. संभाजी बाबू पाटील | वरिष्ठ पदवीधर मुख्याध्यापक | M.A. | M.Ed |
2 | सौ. अनघा अनिल सकपाळ | उपशिक्षिका | H.S.C. | D.Ed |
3 | सौ. ममता दिलीपकुमार मोरे | उपशिक्षिका | M.A. | D.Ed |
4 | श्री. सुधीर श्रीकृष्ण जागुष्टे | पदवीधर शिक्षक | B.A. | D.Ed |
5 | सौ.पुजा सुनिल यादव | उपशिक्षिका | M.A. | D.Ed |
6 | श्री.बाळकृष्ण देवजी जाधव | उपशिक्षक | B.A. | D.Ed |
7 | श्री.वैभव सुरेश थरवळ | पदवीधर शिक्षक | M.A. | B.Ed |
8 | श्री. गोगेश वामन शिंदे | उपशिक्षक | M.A. | D.Ed |
9 | श्री. सुनिल बाबाजी सावंत | उपशिक्षक | M.A. | D.Ed |
10 | सौ. दीक्षा दिलीप महाडीक | उपशिक्षिका | M.A. | B.Ed |
11 | श्री कृष्णा वसंत मेस्त्री | उपशिक्षक | H.S.C. | D.Ed |
12 | सौ.शकुंतला चंद्रशेखर गायकवाड | उपशिक्षिका | M.A. | B.Ed |
13 | श्री.संतोष चांगाप्पा बेळगांवकर | उपशिक्षक | M.A. | T.C.H |
14 | श्री.प्रविण रविकांत जाधव | उपशिक्षक | B.A. | D.Ed |
15 | श्री रमेश जयराम शिवगण | उपशिक्षक | B.A. | D.Ed |
16 | सौ.माधुरी संदेश पवार | उपशिक्षिका | M.A. | D.Ed |
17 | श्री. संदेश प्रकाश झेपले | उपशिक्षक | B.A. | D.Ed |
18 | श्री. श्रीकांत चंद्रकांत शिंदे | उपशिक्षक | M.A. | D.Ed |
19 | श्री.हर्षवर्धन श्रीमंत माने | पदवीधर शिक्षक | M.Sc | B.Ed |
Upcoming and past school events.
School
Event
Festival
Gathering
Event
Event
Email: zppscsmvd113@gmail.com
Address: Chhatrapati Shivaji Ideal School, Devrukh No. 4, Taluka Sangameshwar, District Ratnagiri, Maharashtra
याच संकल्पनेतून छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं .४ या शाळेची यशस्वी घोडदौड सुरु आहे . खरं पाहिलं तर शाळा ही ज्ञानमंदिर भावी पिढीचे उज्वल भविष्य घडविणारी आणि त्यामध्ये विद्यार्थी हे दैवत मानून कठोर परिश्रम घेणारे सर्व सहृदयी शिक्षक हीच या शाळेची अनमोल संपत्ती आहे.सन ३१डिसेंबर २०१८ मध्ये स्थापन झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम घेऊन पुस्तकी किडा तयार न होता आदर्श माणूस घडविणेचे स्वप्न पाहणारी ही आपली शाळा. या शाळेमध्ये कार्यरत असणारी शाळा व्यवस्थापन समिती व पालक आणि त्यांना प्रवृत्त करणारा शिक्षक परिवार विद्यार्थांसाठी काय हवे ? काय नको ? हे जवळून मनाचा वेध घेणारी ही मंडळी असलेने ,शाळेचा पट दिवसेंदिवस वाढतच आहे .
कोण म्हणतं मराठी शाळेचे अस्तित्व धोक्यात आहे ? उलट आमच्या शाळेत प्रवेशबंदी घालण्याची वेळ येते.याचं कारणही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे की ,माझ्या सहकाऱ्यानी घड्याळाकडे कधी पाहिलेच नाही.जितकी विद्यार्थ्यांची मानसिकता ,त्याहीपेक्षा आधी उर्जा घेऊन माझा सर्व सहकारी वर्ग मेहनत घेतो म्हणून या टप्प्यापर्यंत पोहचता येतंय.
शाळा म्हणजे ठराविक पाठ्यक्रम पूर्ण करणारे यंत्र नसून प्रत्येक पैलू आणि टप्प्यावर सिंहावलोकन करून आम्ही पुढे जातो .उदाहरण द्यायचं झालं तर सन २०१५-१६ मध्ये २१९ पट असणारी शाळा आता ५00 वर पोहचली आहे. इयत्ता पहिलीमध्ये शाळेसाठी अपुऱ्या वर्गखोल्या आणि शासनाकडून विद्यार्थी संख्येनुसार उपलब्धता होत नाही.म्हणून प्रशासनाकडे सहकार्य मागावे लागते हीच आमच्या कार्याची यशस्विता.
शाळेत विविधांगी उपक्रम राबवून MPSC,UPSC च्या धर्तीवर स्पर्धा परीक्षेची सुरुवातही इ.२ री पासून होते.राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी स्पर्धा पार करून शाळेच्या वैभवात भर घालताहेत .शासनाच्या विविध उपक्रमाबरोबर काही समांतर शाळा स्पर्धेची गुरुकिल्ली मुलांना देत आहे ही आमची जमेची बाजू आहे. यातून शाळेच्या गुणवत्तेचा उल्लेख उंचावला आहे.त्यापैकीच एक झलक .
' आम्ही थांबलो नाही ,अन् थांबणार नाही
विद्यार्थी विकास हाच आमुचा ध्यास !!
श्री.संभाजी पाटील
मुख्याध्यापक